शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
कोणताही पक्ष कधी संपत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना कित्येकदा असे प्रसंग आले आहेत.पण पक्ष कधी संपला नाही. चंद्राबाबू हरले होते, आज ते मुख्यमंत्री आहेत ना..रामही गेले कृष्णही गेले तर अमित शाह आणि मोदी कोण असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे लवकरच राज्यात आभार यात्रा सुरु करणार आहेत असा प्रश्न पत्रकरांनी केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की पण ते आभार कोणाचे मानणार आहेत ? चौका चौकात ईव्हीएमचे प्रतिकृती उभारुन त्यांचे आभार मानणार का ? संजय राऊत म्हणाले की त्यांनी निवडणूकीत वापरलेला अमर्यादीत ब्लॅक मनी, प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम या तीन गोष्टींचे आभार त्यांनी मानायला हवेत असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. उत्तम जानकर दिल्लीत सर्व निवडणूकीचा डेटा घेऊन निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी पोहचले आहे. त्यांच्याकडे सर्व डेटा आहे. परंतू त्यांना भेट दिली जात नाहीए. १४ महापालिकांच्या निवडणूकांसंदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून योग्य निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणूकांसंदर्भात उद्धवसाहेब चर्चा करुन निर्णय घेतील असेही राऊत यांनी सांगितले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

