‘संजय राऊत महाबंडलेश्वर, प्रयागराजच्या संगमावर डुबकी…’, शिवसेनेचा नेत्याचा खोचक टोला
शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत जोरदार हल्ला चढवला आहे. बघा नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत हे महाबंडलेश्वर असल्याचे म्हणत शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याकडून शिवसेना संपवण्याचं पाप करण्यात आलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी प्रयागराज येथील संगमावर जाऊन डुबकी मारावी, असं वक्तव्य करत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. ‘आता जे महामंडलेश्वर म्हणतात ना तसं संजय राऊत यांना आजपासून नवीन नाव देतोय महाबंडलेश्वर.. महाबंडलेश्वर अशी संजय राऊत यांची परिस्थिती आहे. संजय राऊत यांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर जावं आणि त्यांनी शिवसेना संपवण्याचं जे काही पाप केलं आहे त्याकरता तेथील पाण्यात डुबकी मारावी. ‘, असं नरेश म्हस्के म्हणालेत. पुढे ते असेही म्हणाले, संजय राऊत यांना प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महाबंडलेश्वर अशी पदवी देण्यात यावी, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले?
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

