Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांची राज्यपालांवर टीका, दरवाजे, खिडक्या बंद करून बसलेत, शिंदे सरकारवरून टीकास्र
'बेकायदेशीरपणे घेतलेले निर्णय दिसत नाहीत. राज्यात जो रोष निर्माण झाला आहे, तो दिसत नाही. त्यांनी दरवाजे खिडक्या अशाप्रकारे बंद केल्या आहेत की बाहेर जो आक्रोश सुरू आहे त्याची तिरीप सुद्धा त्यांना दिसत नाही,'अशी टीका संजय राऊतांनी केलीय.
नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवरुन पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. ‘राज्यपाल हे दरवाजे खिडक्या बंद करून बसले आहेत. त्यांना आता काहीच दिसत नाही. कायद्याची पायमल्ली दिसत नाही. बेकायदेशीरपणे घेतलेले निर्णय दिसत नाहीत. राज्यात जो रोष निर्माण झाला आहे, तो दिसत नाही. त्यांनी दरवाजे खिडक्या अशाप्रकारे बंद केल्या आहेत की बाहेर जो आक्रोश सुरू आहे त्याची तिरीप सुद्धा त्यांना दिसत नाही,’अशी टीका संजय राऊतांनी केलीय. दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची गरज आहे, असा दावा संजय राऊत यांनी यापूर्वी केला आहे. तर त्यावर आज पुन्हा त्यांनी भाष्य केलंय.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

