एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीसाठी शिवसेना नेत्यानं काय केली प्रार्थना?
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवाकडे प्रार्थना केली.
जळगाव, ७ नोव्हेंबर २०२३ | राजकीय वर्तुळात नेहमीच राजकीय पुढारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करता दिसतात. इतकंच नाही तर कधी-कधी या टीकेची पातळी घसरल्याचेही पाहायला मिळते. मात्र जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदाराच्या प्रकृतीसाठी शिवसेनेचा एका आमदाराने देवापुढे हात जोडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवाकडे प्रार्थना केल्याचे पाहायला मिळत आहे. माध्यमांशी बोलताना देवाला प्रार्थना आहे की, एकनाथ खडसे यांची तब्येत लवकर बरी होवो, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.





