AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manisha Kayande | शिवसंवाद यात्रेमुळेच भाजपला धडकी, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांची टीका

Manisha Kayande | शिवसंवाद यात्रेमुळेच भाजपला धडकी, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांची टीका

| Updated on: Jul 25, 2022 | 3:53 PM
Share

Manisha Kayande | शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी भाजपवर पलटवार करत आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली.

Manisha Kayande | शिवसेना आमदार मनिषा कायंदे(MLA Manisha Kayande) यांनी भाजपवर (BJP) तिखट प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी पर्यायवरण मंत्री असताना जोरदार काम केले. त्यामुळेच भाजपला पोटशूळ उठले असून त्यांच्या कामाची धडकी भरल्याचा आरोप त्यांनी केला. आता आदित्य ठाकरे (Aditya Thakeray) हे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी केलेल्या कामात गडबड झाल्याचा आरोप करत केंद्र सरकार चौकशी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान आ. कायंदे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ठाकरे यांनी पर्यावरण संवर्धनाचं जोरदार कामं केले. महामार्ग बांधताना त्यांनी जंगलाचं रक्षण केलं. सुमारे 100 पुरातन देवळांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर (International Forum) डाओसाला त्यांनी चांगलं भाषण केलं. चांगले मुद्दे मांडले. त्याचा फायदा झाला. जगाचा देशाकडे बघण्याची नजर बदलली. चांगलं काम पुसता येणार नाही, हीच त्यांची म्हणजे भाजपची पोटदुखी असल्याच्या त्या म्हणाल्या. तसेच चौकशीला आदित्य ठाकरे हिंम्मतीने सामोरे जातील, असे ही त्यांनी सांगितले. भाजप विरोधक म्हणून पाहत नसून तो विरोधकांना शत्रू म्हणून पाहत असल्याची घणाघाती टीका ही त्यांनी केली.