VIDEO : मी लस घेतली, हात दुखतोय, काळजी घेत आहे : संजय राऊत
मुंबईकरांनी नियमांचं पालन केलं नाही. मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत नियमाचे पालन करा. त्यामुळे सरकारवर खापर फोडता येणार नाही लॉकडॉऊन पुन्हा केलेला आपल्याला परवडणारा नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : मुंबईकरांनी नियमांचं पालन केलं नाही. मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत नियमाचे पालन करा. त्यामुळे सरकारवर खापर फोडता येणार नाही लॉकडॉऊन पुन्हा केलेला आपल्याला परवडणारा नाही.त्यामुळे निर्बंध स्वतःहून पाळले पाहिजेत. मी ही लस घेतली आहे त्यामुळे माझा हात दुखतो आहे काळजी घेत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) म्हणाले.
मनसुख हिरेन प्रकरण हे राजकीय प्रतिष्ठेचा कोणी करु नये हे वाईट आहे, अन्वय नाईक खासदार मोहन देलकर ज्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. विरोधी पक्षांनी अशी शंका उपस्थित करणं म्हणजे पोलीस दलाचं मनोबल खच्चीकरण्यासारखं आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
मुंबई पोलिसांच्या तोंडाला कोणी काळ फासलं असं विरोधी पक्षाने बोलू नये. विरोधी पक्ष हा संसदीय लोकशाही जिवंत ठेवतो पण असं बोलणं योग्य नाही. असं बोलणं विरोधी पक्षाच्या भूमिकेला, प्रतिष्ठेला प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.
VIDEO :
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
