Sanjay Raut Daughter Wedding | संजय राऊत, पूर्वशी राऊत यांच्या अलवार नात्याची काही खास दृश्ये

राऊत कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग आहे. सध्या संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील अल्लड नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.

मुंबई : प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास अन् प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वताएवढा आधारही असतो. पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या गडबड सुरु आहे. राऊत कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग आहे. सध्या संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील अल्लड नात्याची झलक पाहायला मिळाली आहे. बापासाठी लेकीचं लग्न म्हणजे ओठांवर हास्य ठेवून डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा हळूच लपवण्याचा प्रसंग. तिच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक आठवणीत हरवण्याचा क्षण. सध्या राऊत कुटुंबीयही हास्य आणि आनंदाच्या अशाच सोनेरी क्षणात रंगून गेले आहे. हा लग्नसोहळा महाराष्ट्रातल्या ‘किंगमेकर’च्या घरातला. संजय राऊत आपल्या लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात दंग झाले आहेत. आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची राऊत खबरदारी घेत आहेत. राऊत यांच्या मुलीचं म्हणजे पूर्वशीचं लग्न येत्या 29 तारखेला आहे. लग्नाआधीच्या मंगल विधी, संगीत यासाठी हे कुटुंबीय पवईतील रेनेसां या सप्ततारांकित हॉटेलमध्ये एकत्र जमलेत.

Published On - 5:36 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI