Sanjay Shirsat : राऊतच गोत्यात येणार? संजय शिरसाट म्हणाले, मलाही ‘ते’ व्हिडीओ दाखवावे लागतील
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांचा एक व्हिडीओ समोर आणला ज्यात शिरसाटांच्या बाजुला पैशाने भरलेली एक बॅग दिसत होती. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली. यानंतर शिरसाटांनी उत्तरही दिलं. मात्र आज त्यांच्याकडून थेट इशाराच देण्यात आलाय.
माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला असल्याचे म्हणत वारंवार चारित्र्यहनन करण्याचा प्रकार सुरू आहे, त्यासाठी संजय राऊतांना अब्रूनुकसानीची नोटीस आज पाठवणार आहे, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही शिरसाटांनी दिला. पुढे ते असेही म्हणाले, राज्यघटना ते तर मानतच नाही आणि त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते फुशारकीने सांगतील की अशा फार नोटीसा मी खिशात घालून फिरतो. मात्र मी कायद्याच्या चौकटीत राहून मी आज त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
तर यासंदर्भात राऊतांकडून कोणतंही उत्तर आलं नाही तर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. मला असं वाटतंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. कुठे-कुठे सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्यात त्याचे व्हिडीओ मला सुद्धा दाखवावे लागतील, त्यांनी माझ्याविरोधात आणखी गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर त्याच भाषेत उत्तर देणार, असा थेट इशाराच शिरसाट यांनी दिला.
Sanjay Shirsat VIDEO : हातात सिगारेट, पैशांनी भरलेली बॅग अन्… शिंदेंच्या मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

