‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री २ वाजता देश…’, शिवसेनेच्या बड्या नेत्याची भविष्यवाणी
ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर बोलताना रामदास कदम यांनी मोठं भाष्य केले आहे.
आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर बोलताना रामदास कदम यांनी मोठं भाष्य केले आहे. रामदास कदम म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, हे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा, अशी भविष्यवाणीच रामदास कदम यांनी केली. ते पुढे असेही म्हणाले, बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेईमानी केली. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, असा जोरदार हल्ला रामदास कदम यांनी केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात आहे. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या जास्त खासदार निवडून आले तेव्हा त्यांनी मशिनवर कुठे खापर फोडलं का..? नाही ना.. मग आता विधानसभेला महायुतीच्या बाजूने निकाल लागला की मशीन चांगलं आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट… आपलं अपयश झाकण्यासाठी ते मशीनला दोष देत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

