Vasant More : भविष्यातही हे दोन्ही… ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, वसंत मोरे म्हणाले आज दसरा-दिवाळी, पांडुरंगाला काय घातलं साकडं?
सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. हा मेळावा सकाळी दहा वाजता मुंबईतील वरळी डोम येथे पार पडणार आहे.
महायुतीने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठाकरे गट अन् मनसेचे नेते, कार्यकर्ते मुंबईतील वरळी डोम येथील विजयी मेळाव्याच्या दिशेने रवाना होतायंत अशातच ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे देखील यावर मेळाव्यासंदर्भात भाष्य केलंय.
‘उद्या आषाढी एकादशी आहे. उद्या पांडुरंग सगळ्यांना भेटणार आहे. मला तर आज दोन्ही पांडुरंग एकत्र दिसणार आहेत. भविष्यातही हे दोन्ही पांडुरंग एकत्रच असावेत, यासाठी मी प्रार्थनासुद्धा केली आहे. मी पांडुरंगाला साकडं घातलंय’, अशी प्रतिक्रिया पुण्यातून वसंत मोरे यांनी दिली. जे आधी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षातही होते. ते असेही म्हणाले की, जेव्हापासून मला काही घटनांचे संकेत येऊ लागले तेव्हापासून मला सर्वांत जास्त आनंद आजच्या दिवसाचा आहे. आमच्यासाठी आजच दसरा आणि दिवाळी आहे. गेल्या 18 ते 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आम्ही रात्री 500 किलोमीटरचा प्रवास करून विजय मेळाव्यासाठी आलोय. जशी तुम्हा सर्वांना मेळाव्याची उत्कंठा आहे, तशी आम्हालाही या आहे. आज प्रत्येकाची पावलं मुंबईच्या दिशेने निघाली आहेत.’, असंही वसंत मोरे म्हणाले.