कोल्हापुरात शिवसेनेची निष्ठा रॅली! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी जल्लोष
शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात निष्ठा रॅली (Kolhapur Shivsainik) काढण्यात आलीये.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात निष्ठा रॅली (Kolhapur Shivsainik) काढण्यात आलीये. फक्त मुंबईतच नाही तर कोल्हापुरात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा (Birthday) जल्लोष दिसून येतोय.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

