Marathi News Videos Shiv Shankar Yadav, a bird lover from Chandrapur district, has provided shelter by building 225 wooden nests in his own house to save them

चिऊताईला वाचवण्यासाठी ‘त्याची’ धडपड, घरातच केली 225 घरटी अन् चिमण्यांना दिला आश्रय
VIDEO | मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासह स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी त्यांचा अनोखा संघर्ष, कोण आहे तो चिमणी प्रेमी?
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राहणाऱ्या शिवशंकर यादव या चिमणी प्रेमीचा मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठीचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. ते स्वतः एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सध्या कंपनी बंद पडल्याने निम्म्या पगारावर त्यांचे कुटुंब गुजराण करत आहे. चिमण्यांचे संगोपन, पिलांची आणि जखमी चिमण्यांची शुश्रुषा यासह त्यांचा सांभाळ करून शिवशंकर यादव यांना मोठे समाधान लाभत आहे. चिमण्या आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे मला जे शक्य आहे ते करतोय असेही ते म्हणतात. चंद्रपूरकर चिमणीप्रेमी शिवशंकर यादव यांनी चिमण्यांसाठी घरातच 225 लाकडी घरटी तयार केली. मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम आणि आत्मिक समाधानासाठी स्वखर्चातून बांधलेली घरटी आकर्षण ठरत आहेत. पुढील काळात आर्थिक झळ सोसूनही आणखी शंभर घरटी तयार करण्याचा मानस आहे.
Published on: Apr 04, 2023 10:44 PM
Related Video
मोहन भागवत अमेरिकेत जाण्यापूर्वीच राऊत यांचा काय सल्ला? काय म्हणाले?
Insta-Facebook या काळात वापरताच नाही येणार कारण तरी काय?
आव्हान देऊ नका, अडचणीत याल... संजय राऊत यांचा सरनाईक यांना इशारा
; टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने असं विधान का केलं?
मित्र पक्षांना सोबत ठेवायचय, त्यामुळे..भाजप नेतृत्वाचा महत्वाचा संदेश
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर