विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावरून शिवेंद्रराजे भोसलेंची अजित पवारांवर टीका केली आहे. एका दिवसात इतिहास बदलता येणार नाही. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरचं होते. इतिहास आपण वाचला आहे. स्वराज्यासाठी जरी लढा असला तरी ते धर्माचं रक्षणही करत होते, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.