Shivraj Bangar Video : कराडकडून १५ लाखांची खंडणी? होणाऱ्या आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले…
अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी वाल्मिक कराडकडून १५ लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, असा FIR बाहेर आला आहे, असं म्हटलं होतं.
वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केली होती, अशी माहिती समोर आणणारं एफआयआर बाहेर आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडसंदर्भात एक ट्वीट केलं होतं. यानंतर एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अंजली दमानियांनी केलेल्या या आरोपांवर शिवराज बांगर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, 2024 ला माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये वाल्मिक कराड हे पिडीत आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून जामिन मिळालं आहे. ती बातमी आज अचानक बाहेर आली ,मी एक सामाजिक काम करणारा समाजसेवक आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबावर जवळपास नऊ दहा गुन्हे दाखल केले गेले आहेत. या प्रकरणासंदर्भात माझ्यावरील आरोप मी कागदपत्रांशी सिद्ध करणार आहे आणि त्याचे पुरावे देणार असल्याचे शिवराज बांगर यांनी म्हटलंय. या प्रकरणातील पुराव्याचे कागदपत्र मी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांकडे ठेवलेले आहेत ती गोळा करून मी माझी बाजू माध्यमांसमोर मांडणार आहे. लोकांना असं वाटू नये की शिवराज बांगर सुद्धा गुंड आहे. वाल्मिक कराडकडून याने खंडणी घेतली म्हटल्यावर लोकांकडून किती घेतली असेल? या सगळ्या प्रकरणात मला छळलं जाईल जातीच्या बाहेर काढलं जाईल, अशी शक्यताही शिवराज बांगर यांनी व्यक्त केली तर धनंजय मुंडे हे मी म्हटल्याने आरोपी होणार नाहीत किंवा मी सांगितल्याने त्यांना कोण सोडणार नाही, असं म्हणत मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांनी बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले.