
राज ठाकरे यांच्या सभेलाही तुमच्यापेक्षा जास्त गर्दी होते; शिवसेनेच्या नेत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : तुम्हीच मुख्यमंत्री राहा, असं आमदार शेवटपर्यंत सांगत असताना राजीनामा का दिला? खोटं बोलू नका खरं बोला, एवढीच नम्रपणे विनंती, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
शिर्डी, अहमदनगर : उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्यासभेपेक्षा दुप्पट गर्दी होईल, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे. नारायण राणेंचा पराभव करायला गेलात, तेव्हा तुमच्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं. तरीही नंतरच्या काळात कोकण तुमच्या मागे उभा राहिला. शाखा प्रमुखांना कधी वर्षा बंगल्याच्या जवळही फिरकू दिलं जात नव्हतं. आता आज माझ्यावर अन्याय केला, असं दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं केसरकर म्हणाले.
Published on: Mar 06, 2023 11:53 AM
Related Video
सोनं चांदीने झोपच उडवली, भाव थेट रॉकेट, 10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी....
तुमच्या टाकीतून मासे मेल्यासारखा पाण्याचा वास येतो? ट्राय करा सोपी..
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 13 रुपयांनी वाढ, सरकारच्या घोषणेने खळबळ
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पाचव्या टी20 सामन्यापूर्वीच प्रवास संपला
IMD weather forecast : पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, पाऊस धुमाकूळ घालणार
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..