Uday Samant Video : ‘हा बालिशपणा, मी भीक घालत नाही, शिंदे आणि माझ्यात…’, उदय सामंतांनी ‘त्या’ वक्तव्यावरून राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना फटकारलं असल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले?
‘शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्या उठाव्यामध्ये मी होतो आणि त्याचमुळे मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही’, असं उदय सामंत राऊतांच्या वक्तव्यावर म्हणाले. तर विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना सामंत असेही म्हणाले, ‘दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटलात याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे.’, असं म्हणत उदय सामंत यांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्या सोबत 20 आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. तर महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लान होता, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. यासोबत उद्धव ठाकरेंना संपवलं आता एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवीन ‘उदय’ पुढे येईल, असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
