Ramdas Kadam यांचा नाव न घेता थेट इशारा, ‘…राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार’
VIDEO | शिवसेना नेत्यानं आदित्य ठाकरे यांची काढली उंची? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेते रामदास कदम यांनी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना काय केली सडकून टीका?
रत्नागिरी, २२ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मी बोलेन, पण आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणं ठीक होणार नाही, कारण त्यांची तितकी उंची नाही नारायण राणे यांच्याविरोधात मी संघर्ष करत होतो, त्यावेळी मालवण कणकवलीत तुम्ही कितीवेळा आलात? तुम्ही कुठे होतात? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. तर विनायक राऊत हे निवडणुकीला उभे होते त्यांच्यासभा देखील केल्यात. त्यावेळी कुठे होते? आमदार, खासदार मंत्री यांच्यासह सर्वसामान्यांची भेट घेत नव्हते. मात्र आता बाप-बेट्याला कामाला लावलंय. त्यामुळे आता दोघे पळताय, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव-आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

