Sushma Andhare | खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही? सुषमा अंधारेचा सवाल
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी म्हटले की, खरातच्या मुलीला 32–33 लाखांचा फ्लॅट भेट देण्यात आला असून या सर्व धागेदोऱ्यांचा मागोवा सांगोल्यात सापडतो. सांगोल्यातील विविध पूजांमध्ये खरात आणि मंडळी उपस्थित होते.
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी म्हटले की, खरातच्या मुलीला 32–33 लाखांचा फ्लॅट भेट देण्यात आला असून या सर्व धागेदोऱ्यांचा मागोवा सांगोल्यात सापडतो. सांगोल्यातील विविध पूजांमध्ये खरात आणि मंडळी उपस्थित होते; ललित पोकळे तसेच रुपाली चाकणकरही त्या पूजेत सहभागी होत्या. सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, खरातच्या भोंदूपणा आणि प्रतिष्ठा वाढवण्याकरिता अनेकांनी जाणिवपूर्वक मदत केली. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, चाकणकर बाईंना खरातच्या संदर्भात माहिती असल्यासही पोलिसांना तपासासाठी पत्र का दिले नाही? चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठिशी घातल्याची भूमीका घेतली, तरी एसआयटी त्यांना चौकशीसाठी का बोलावत नाही? माध्यमांकडून माहिती मिळते की, चाकणकर यांना समन्स गेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही, अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळती आहे. या प्रकरणामुळे खऱ्या तथ्यांवर आधारित चौकशी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Published on: Mar 31, 2026 02:15 PM
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;

