Video | मुंबईच्या शौचालयातही एवढी घाण नाही… रामदास कदमांवर कुणाची सणकून टीका?
रामदास कदमांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्याचं काही नाही, मात्र उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान ऐकून राज्यातील जनता त्यांची जोड्याने पूजा करतील, असं वक्तव्य जाधव यांनी केलंय.
मुंबईः संपूर्ण मुंबईत जेवढी शौचालयं आहेत, त्यातून जेवढी घाण निघते, त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कालच्या सभेत ओकली, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. बंडखोर नेते रामदास कदम यांची रविवारी दापोलीत (Dapoli) सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेनेतील नेते आणि उद्धव ठाकरेंवरची नाराजी बोलून दाखवली. त्याला प्रत्युत्तरादाखल भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रामदास कदमांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्याचं काही नाही, मात्र उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान ऐकून राज्यातील जनता त्यांची जोड्याने पूजा करतील, असं वक्तव्य जाधव यांनी केलंय.
Published on: Sep 19, 2022 12:28 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
