बाळासाहेबांपुढे कोणीही नतमस्तक होत असेल तर विरोध का करायचा? : सदा सरवणकर
नारायण राणे यांना विरोध करायचा की त्यांना स्मृती स्थळावर दर्शन घेऊ द्यायचे याबाबतीत पक्षाकडून अद्याप कुठलेही आदेश नाहीत, असं सदा सरवणकर म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येत आहेत. नारायण राणे यांना विरोध करायचा की त्यांना स्मृती स्थळावर दर्शन घेऊ द्यायचे याबाबतीत पक्षाकडून अद्याप कुठलेही आदेश नाहीत, असं सदा सरवणकर म्हणाले. शिवसेनेचे प्रवक्ते त्या संदर्भात भूमिका मांडतील.माझ्या मतदारसंघाचा आणि विभागाचा विकास करणं माझं काम आहे. कोण नडायला आला तर त्याला नडायचं आणि कुणी बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला येत असेल तर त्याला विरोध का करायचा ?, असं मत सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं. मुंबईत शिवसेनेची सत्ता कायम ठेऊ, असं सरवणकर म्हणाले.खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दर्शन घेऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, नारायण राणे यांना अडवण्यासंदर्भात कोणतेही आदेश नाहीत, असंही सदा सरवणकर म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

