Marathi News » Videos » Shivsena mla Shambhuraje desai criticized on Aditya Thackeray over nishtha yatra
Shambhuraj Desai on Nishtha Yatra | ‘निष्ठा यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत’
आदित्य ठाकरे यांना दाखवण्यासाठी तरी पाटण मतदार संघातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी भगवा गमचा गळ्यात घातला, याचे समाधान आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केली.
सातारा : पाटणमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आयोजित करण्यात आली होती. या निष्ठा यात्रेवरुन आमदार शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर टिका केली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांची राष्ट्रवादी पुरस्कृत निष्ठा यात्रा पार पडली. आदित्य ठाकरे यांना दाखवण्यासाठी तरी पाटण मतदार संघातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी भगवा गमचा गळ्यात घातला, याचे समाधान आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केली.