खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने धक्कादायक सत्य

शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना कसं आमिष दाखवलं, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या, याचा पाढाच वाचून दाखवला.

सांगोला : पूर्वी राजकारणात निष्ठा, तत्व, शब्दांना मान होता. परंतु अलीकडच्या काळात निष्ठा-तत्वांची जागा पैशाने घेतलीय. अशा प्रकारची उदाहरणे वारंवार समोरही येतात. अशी उदाहरणं लोकांमध्ये चर्चेत असतात. पण राजकारणासाठी पैशांचं वाढलेलं महत्त्व, तडजोडींना दिलेला छेद खुद्द अशा गोष्टी जेव्हा लोकप्रतिनिधीच बोलून दाखवतात, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने लक्षात येतं. एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना कसं आमिष दाखवलं, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या, याचा पाढाच वाचून दाखवला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI