संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन तास खलबतं, मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाल्याची राऊतांची माहिती

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक पार पडली.

मुंबई: प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा महत्वाचा खुलासा केला.

त्यांनी सांगितले की, प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे राऊत यांनी म्हटले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI