Sanjay Raut : राजकारणात मोठी घडामोड घडणार? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांचं विधान
Sanjay Raut Press Conference : संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर पुन्हा एकदा नवा दावा केला आहे.
पडदा उघडायला वेळ आहे. तो योग्य वेळी उघडला जाईल. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा चर्चा नाही. मी सांगत आहे ना, ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली गेली असल्याचं सांगितलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात भावना असेल, तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, अशी भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल. पण हा पडदा उघडायला वेळ आहे. तो योग्य वेळी उघडला जाईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

