Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana Editorial Video : 'बाळासाहेब ठाकरे नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

Saamana Editorial Video : ‘बाळासाहेब ठाकरे नसते तर काय झालं असतं?’ ‘सामना’ अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Jan 23, 2025 | 2:01 PM

'तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते....', सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून नेमकं काय म्हटलंय.

बाळासाहेब नसते, शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झाले असते? असा सवाल करत महाराष्ट्र दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे झाले असते, असं सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून म्हटलं आहे. आता मराठी माणूस जाती आणि पोटजातीत फाटला ठिगळही लावता येत नाहीत, असं सामनातून म्हटलं आहे. ‘भाजपास डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते’, असं आजच्या सामनातून म्हटलं आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्राची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा, मराठी माणसाचा गहाण पडलेला स्वाभिमान, कष्टकऱ्यांची उडालेली धूळधाण सावरून पुन्हा नवा महाराष्ट्र उभा करणे हीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल, असं सामनातून म्हटलं आहे. नाहीतर ‘उडाले शब्दांचे बुडबुडे’ असेच घडेल. चला मग, उचला तो बेलभंडारा आणि लागा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याच्या कामाला!, असा हुंकार पुन्हा एकदा सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून भरण्यात आलाय.

Published on: Jan 23, 2025 02:01 PM