Gulabrao Patil : बाहेर खाट टाकून झोपा लक्ष्मी येणारे, लक्ष्मी म्हणजेच… गुलाबराव पाटील हे काय बोलून गेले?
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’ संबंधीच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपल्यास लक्ष्मी येईल, असे विधान त्यांनी केले होते. नंतर ‘लक्ष्मी’ म्हणजे आई-बहिणी असे स्पष्टीकरण दिले, मात्र घराबाहेर खाटा टाकण्याच्या संदर्भावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’ संबंधीच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना म्हटले होते की, “एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे.” त्यांच्या या विधानाचे विविध अर्थ काढले गेले आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या विधानानंतर निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी गुलाबराव पाटील पुढे आले. त्यांनी सारवासारव करत सांगितले की, “लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा होत नाही, तर लक्ष्मी आपल्या आई बहिणीचंही नाव असतं.” त्यांना चुकीचे समजले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वादादरम्यान, विरोधकांनी प्रश्न विचारला आहे की, जर गुलाबरावांना ‘लक्ष्मी’चा संदर्भ आई-बहिणींच्या रूपाने द्यायचा होता, तर “घराबाहेर खाटा टाकण्याचं” विधान कशासाठी होतं? त्यांच्या मूळ विधानाचा आणि नंतर दिलेल्या स्पष्टीकरणाचा संबंध लागत नसल्याने त्यांच्यावर ‘यू-टर्न’ घेतल्याची टीका होत आहे. विरोधकांनी म्हटले आहे की, प्रचारसभेमध्ये हा माणूस भरसभेत ‘लक्ष्मी दर्शनाची’ भाषा करतो आणि नंतर लगेच ‘यू-टर्न’ मारतो. मंत्री पाटील यांनी मागील निवडणुकांचा संदर्भ देत, मतदानादरम्यान ‘लक्ष्मी’ फिरत असल्याच्या चर्चाही त्यांच्या भाषणात केल्या होत्या.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

