Badlapur Breaking : बदलापुरात आमदारांच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार
Badlapur Shootout News : बदलापूरात आमदारांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यात एकजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापूरात आमदारांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन गटातल्या आपसातील वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर यात एकजण जखमी झाल्याची देखील माहिती आहे.
बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडलीय. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.