मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? सुरेश वाडकर नेमकं काय म्हणाले, पाहा व्हिडीओ
शिर्डीत ज्याकाळात मातीची पाऊल वाट होती तेव्हापासून आपण शिर्डीत येत आहे.त्यावेळी आम्ही येथील जवळच असलेल्या लक्ष्मीवाडीत आमच्या कौटुंबिक मित्रांकडे उतरायचो. सायकलवरून येऊन तासनतास बाबांच्या दरबारात बसायचो. आता माझ्या कामासाठी वरचे वर येत असतो असेही ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी सांगितले.
नाशिक | 26 फेब्रुवारी 2024 : राजकारणावर मराठी कलाकार केव्हाच भाष्य करीत नाहीत. प्रसिद्ध गायक आणि साईभक्त सुरेश वाडकर हे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांना राज्यातील सध्याची परिस्थिती आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, असे वाडकर सांगितले. त्यांना यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणावरुन राज्यात दुफळी माजत असल्याबद्दल विचारले. तेव्हा वाडकर यांनी म्हटले की, बाबांनीच मोदीजींना पंतप्रधानपदी बसवले आहे. मोदींजीची नेमणूक देवी आणि देवतांनी आणि स्पेशली बाबांनी सर्वकाही चांगलं आणि चांगलं आणि चांगल करण्यासाठीच नेमणूक केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

