Marathi News Videos Sinner NCP MLA Manikrao Kokate daughter Simantini banner in Nashik causes disruption in Mahavikas Aghadi

एका बॅनरमुळे महाविकास आघाडीत होणार बिघाडी? बॅनरवर नक्की लिहिलंय तरी काय?
VIDEO | नाशिक लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये होणार बिघाडी? कारण नेमकं काय? 'त्या' बॅनरची होतेय चर्चा
नाशिक : आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे आणि त्यातच दुसरीकडे नाशिकमध्ये लागलेल्या एका बॅनरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. याचं कारण म्हणजे सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे यांचं लागलेले बॅनर. या बॅनरवर नक्की आशय असा कोणता आशय आहे, ज्यामुळे काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्येची जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनरवर नाशिक लोकसभेच्या पहिल्या महिला भावी खासदार सिमंतीनी माणिकराव कोकाटे औक्षवंत व्हा… असा आशय लिहिला आहे. भाजप सेनेची युती होती तेव्हापासून नाशिक लोकसभा जागा ही पारंपारिकरित्या शिवसेनेकडे म्हणजे आताच्या ठाकरे गटाकडे जाणार हे निश्चित असताना राष्ट्रवादीच्या नेत्याकडून असं बॅनर लावणं हे चर्चेचा विषय ठरतोय.
Published on: Apr 16, 2023 3:10 PM
Related Video
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?
PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब
देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात
75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, 2 दिवस संघर्ष, त्यानंत जे घडलं...
1 नंबर फिलिप्सने पकडलेली ही कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं, VIDEO
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार