मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का

| Updated on: Nov 10, 2024 | 5:44 PM

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुंबईतील विक्रोळी भागात एका कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांसह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुंबईतील विक्रोळी भागात एका कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांसह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चांदीच्या विटा पकडलेल्या या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या असून या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. ज्यांची किंमत करोडोंच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. कॅश व्हॅनमध्ये सापडलेल्या या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीमधून चालल्या होत्या. यावेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या वाहनाची तपासणी करण्यात आली. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Published on: Nov 10, 2024 05:44 PM