मनसेच्या जागर यात्रेत कोकण कन्येचं साकडं?, म्हणाली, ‘या सरकारला जाग येऊन दे’
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. तर यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. ही जागर यात्रा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे.
मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर गेली १७ वर्ष झाली तरी या महामार्गाचे काम झालेले नाही. त्यावरून मनसे आता आक्रमक झाली आहे. तर यावरून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी मनसैनिक मोठ्या सख्येने हजर होते.
यावेळी कोकण कन्या अंकिता प्रभू वालावलकर ही मनसेच्या या जागर यात्रेत सहभागी झाली. तसेच तिने यावेळी साकडं देखील घातलं. यावेळी तिने रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणार अपघात यामुळे चाकरमान्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळेच आता मनसेकडून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात कोकण जागर यात्रेची सुरुवात केली आहे. तर तिने कशा पद्धतीने साकडं घातलं आहे पाहा हा व्हिडिओ
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

