ढगफुटीनं झालं पाणीच पाणी…
आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी, कणबस, बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घातले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे परिसरातील नद्या नाल्यांना पूरस्थिती आली आहे. त्यामुळे बोरगावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या अक्कलकोटमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तास झालेल्या पावसाने बोरगावच्या आसपासच्या अनेक ओढ्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणातून 600 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी, कणबस, बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घातले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

