Solapur Crime : बीड पॅटर्नची पुनरावृत्ती; अंगावर सळईचे चटके, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
Solapur Malshiras Crime News बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच सोलापूर जिल्ह्यात देखील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका तरुणाला अंगावर चटके देत त्याची हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
माळशिरस तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळशिरसमधील एका तरुणाची नग्न करून हत्या करण्यात आली. तरुणाच्या अंगाला चटके देऊन त्याचे हालहाल करून त्याला मारण्यात आलं असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जय निर्घृण प्रकारे झाली त्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला. जालन्यात देखील तरुणाला क्षुल्लक कारणावरून पायल चटके देऊन मारहाण केल्याची घटना ताजीच आहे. असं असताना आता माळशिरसमधल्या पिलीव गावात अंकुश खुर्द या 32 वर्षीय तरुणाला अंगाला चटके देऊन त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी अनैतिक संबंधातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

