Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय झालं, इनसाईड स्टोरी
Santosh Deshmukh Case Hearing In Kaij Court : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज पहिली सुनावणी केज कोर्टात झाली. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं? कोर्टाने आरोपींना काय विचारलं? आरोपींनी काय उत्तरं दिली? याची सर्व माहिती आता समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 26 तारखेला होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये केज कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड करण्यात आली. यावेळी कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं, तेव्हा वाल्मिक कराडने हात जोडले. वाल्मिक कराड न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होता.
केजच्या न्यायालयात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. वाल्मिक कराड याने वकील बदलला आहे. तर सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर राहिल्याने या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 तारखेला ठेवण्यात आली आहे. यावेळी केज न्यायालयाने आरोपींची ओळख परेड केली. सर्व आरोपींना हात वर करण्यास सांगितल्यावर वाल्मिक कराड याने हात जोडले. तर आरोपीच्या वकिलांनी जबाबाच्या कॉपी मागीतल्या आहे. त्यावर पुढच्या तारखेला जबाबाच्या कॉपी देऊ असं सरकारी वकील म्हणाले आहेत. चार्जशिट मिळाली आहे का? वकील दिले आहेत का? अशी विचारणा कोर्टाने आरोपींना केली. त्यावर होय म्हणून आरोपींनी उत्तर दिलं. तसंच तपासावर आक्षेप आहे का? अशी विचारणा फिर्यादी शिवराज देशमुख यांना कोर्टाने केली. त्यावर कोणताही आक्षेप नसल्याचं शिवराज देशमुख यांनी म्हंटलं. त्यानंतर सरकारी वकिलांची सुनावणीसाठी 26 तारीख देण्याची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आली.

महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..

सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला

संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?

निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
