Video : कॉलेजमधून घरी परतत होती, कंटेनरनं धडक दिली, सोलापुरातील वैष्णवीचा जागीच मृत्यू!
Solapur Accident : वैष्णवी सरवदे असे ठार झालेल्या युवतीच नाव आहे. ती संगमेश्वर महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.
सोलापूर : सोलापुरात महाविद्यालयातून घरी परतत असलेल्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झालाय. बाळे येथील राहत्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने दिलेल्या धडकेत कंटेनरच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन तरुणी जागीच ठार झालीय. पुणा नाका येथील नागनाथ मंदिराजवळ हा अपघात झालाय. वैष्णवी सरवदे असे ठार झालेल्या युवतीच नाव आहे. ती संगमेश्वर महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या सर्व मैत्रिणींना उद्या पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन घरी निघाली होती. मात्र तिची ही भेट शेवटची ठरली. या प्रकरणी चालक अजरोद्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे. चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवीच्या अपघाती मृत्यूनं तिची आई, वडील आणि एक भाऊ यांना मोठा धक्का बसलाय. वैष्णवीचा मृतदेह पाहून तिच्या आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. या प्रकारामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

