Solapur | सोलापुरात पावसामुळे पुरावरील संरक्षक भिंत वाहून गेली

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बनजगोळ-अक्कलकोट या मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूची संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करुन आता धोक्याचे बनले आहे. तीन-चार दिवसांपूर्वी राज्याच्या इतर भागासह अक्कलकोटमध्ये सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली, पावसामुळे अक्कलकोट बनजगोळ पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बनजगोळ-अक्कलकोट या मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूची संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करुन आता धोक्याचे बनले आहे. तीन-चार दिवसांपूर्वी राज्याच्या इतर भागासह अक्कलकोटमध्ये सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली, पावसामुळे अक्कलकोट बनजगोळ पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे गावातील लोकांचा तालुक्याची संपर्क तुटला होता. आता पाणी ओसरलेले आहे मात्र पुलाच्या दोन्ही बाजूची संरक्षक भिंत वाहून गेली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI