AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane | किरण मानेंची वर्तणूक चांगली आहे, मालिकेतील काही कलाकारांचा किरण मानेंना पाठिंबा

| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 6:58 PM
Share

याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या दिव्या पुगावकर (मावू), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे याच मालिकेतील इतर सहकलाकारांच्या एका गटानं किरण माने यांना पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

सातारा : कलाकार किरण मानेंना (Kiran Mane) मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर राज्याचं राजकारणंही ढवळून निघालंय. मात्र मालिकेतून काढून का टाकलं ? यावरुनच आता मुलगी झाली हो मालिकेतील सहकलाकारांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी किरण मानेंवर गंभीर आरोप करत त्यांना व्हिलन करुन टाकलं आहे, तर काही सहकलाकार यांनी किरण मानेंच्या समर्थनात वक्तव्य करत किरण मानेंचं कौतुक केलंय. एकूण आता ही मालिका चर्चेत आली असून या मालिकेतून (Marathi Serial Mulgi Jhali Ho) सहकलाकारांमध्ये उभी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतंय. किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असं सांगण्यात येत होतं. मात्र अखेर यावर पडदा टाकत महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिलं आहेत. दरम्यान, याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या दिव्या पुगावकर (मावू), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे याच मालिकेतील इतर सहकलाकारांच्या एका गटानं किरण माने यांना पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.