ठाकरे कुटुंब कमजोर करण्याचा काहींचा मनसुबा- संजय राऊत
ठाकरे कुटुंबीय कमजोर करण्याचा काही जणांचा मनसुबा असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मात्र यात कुणालाही यश मिळणार नसल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोर आव्हानं निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक जण मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत तर अजूनही बरेच जण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी खंभीर उभे असल्याचे दिसत आते. ठाकरे कुटुंबीय कमजोर करण्याचा काही जणांचा मनसुबा असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मात्र यात कुणालाही यश मिळणार नसल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम उभे असू असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान दोन दिवसांआधी खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनामध्ये मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची सर्वसामान्यांपासून तर राजकीय वर्तुळात सगळीकडेच चर्चा होत असून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
