Sonia Gandhi : सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जाणार, राहुल, प्रियंका गांधींही सोबत असणार
सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जात असतानाच काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि पक्षाध्यक्षपदाची निवडणुकीची तयारीही काँग्रेसकडून केली जात आहे.
नवी दिल्ली: एक मोठी बातमी हाती आली आहे. 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘महंगाई पर हल्ला बोल’ या रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितल आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) लवकरच वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार (Abroad tour) आहे. त्यांच्यासोबत प्रियंका आणि राहुल गांधीही यांचासही त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली. मात्र, सोनिया गांधी परदेशात कधी जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार असून यावेळी त्या आपल्या आजारी आईचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या मायदेशी परत येतील असंही काढलेल्या निवेदनात सांगण्यात आला आहे.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

