एकच जाणते राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज : फडणवीस
जाणता राजा वर बोलताना फडणवीस म्हणाले, देशात केवळ एकच जाणते राजे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं जनता म्हणणार नाही
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्य रक्षक’ यांच्यावरुन राज्याचं राजकारण गरम झालं आहे. तर छगन भुजबळ यांनी “राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांना जाणता राजा म्हणणं काय वावगं आहे.” असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची कान उघडणी केली आहे.
यावेळी फडणवीस यांनी, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणायला कोणाचीच ना नाही. पण संभाजी महाराज धर्मवीर नाही, हे म्हणण चूक आहे. हा संभाजी महाराजांवर अन्याय होईल. त्यांच्या विचारांशी एकप्रकारे हा द्रोहच आहे
तसेच जाणता राजा वर बोलताना फडणवीस म्हणाले, देशात केवळ एकच जाणते राजे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं जनता म्हणणार नाही
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

