Special Report | वाद टोकाला..चित्रा वाघ V/s मेहबूब शेख, बीडचं ‘ते’ प्रकरण काढणार, शेख यांचा इशारा
चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मेहबूब शेख पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रा वाघ यांना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ म्हणत ‘आधी नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, मग आम्हाला शिकवा’, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला होता. त्यानंतर चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद आता अधिक पेटल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय. चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मेहबूब शेख पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रा वाघ यांना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ म्हणत ‘आधी नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, मग आम्हाला शिकवा’, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला होता. त्यानंतर चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

