Special Report | सेना-भाजपचं पुन्हा एकदा ‘वाघ’ पुराण, चंद्रकांतदादा, संजय राऊत यांच्यात जुंपली

‘वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघाच्या मैत्रीवरुन जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त ‘खास’ शुभेच्छा दिल्या आहेत. “चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केप कापावेत. विशेष म्हणजे लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्याकडं पाहिलं जावं. पाटील हे अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आहेत. एखादं लहान मुल कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणत प्रत्युत्तर दिलंय. (Allegations between Sanjay Raut and Chandrakant Patil over Friendship)