Special Report | भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन गोत्यात ?

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कछित वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी जळगावमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले होते.

जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आलाय. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कछित वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी जळगावमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेच पुणे पोलीस जळगावमध्ये दाखल झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. महाजनांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर खडसे यांनी राजकीय टायमिंग साधत जोरदार चिमटा काढला होता. महाजन यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही समोर आलं. त्या भीतीपोटीच गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला खडसे यांनी लगावला. तसंच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले राहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI