Special Report | भास्कर जाधवांची आता अधिकाऱ्यांना दमदाटी !

भास्कर जाधव डॅमेज कंट्रोलसाठी आज पुन्हा एकदा चिपळूणच्या बाजारपेठेतील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना दमदाटी केली.

चिपळूणमध्ये पूरस्थितीची पाहणी करताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एका महिलेशी अरेरावी पद्धतीने बोलत असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आपल्याला ती महिला मुलीप्रमाणे असल्याचं म्हटलं. तर संबंधित महिलेनंही या वादावर पडदा टाकला आहे. अशावेळी भास्कर जाधव डॅमेज कंट्रोलसाठी आज पुन्हा एकदा चिपळूणच्या बाजारपेठेतील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना दमदाटी केली. रस्त्याच्या सफाईसाठी अधिकारीवर्ग उपस्थित नसल्यामुळे जाधव यांनी फोनवरुन अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI