Special Report | कश्मिरी पंडितांचा जीव धोक्यात…स्थलांतर सुरु -tv9

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंचं टार्गेट किलिंग सुरु आहे...त्याचा रोष काश्मिरी पंडितांसह काश्मीरमध्ये नोकरीसाठी गेलेल्या हिंदूंकडून व्यक्त होतोय.  इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिल. असं ग्वाही दिलीय. 

दादासाहेब कारंडे

|

Jun 05, 2022 | 10:42 PM

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंचं टार्गेट किलिंग सुरु आहे…त्याचा रोष काश्मिरी पंडितांसह काश्मीरमध्ये नोकरीसाठी गेलेल्या हिंदूंकडून व्यक्त होतोय.  इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिल. असं ग्वाही दिलीय.
गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग’ काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरापासून काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहेत. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरक्ष: शिरकाण सुरु आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली. पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले. ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें