Special Report | नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरुन मिलिंद नार्वेकर यांची खोचक टीका

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. त्यांनी येत्या दहा दिवसांत न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 27, 2022 | 10:56 PM

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. त्यांनी येत्या दहा दिवसांत न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, दुसरीकडे याप्रकरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक खोचक ट्विट करत झणझणीत उत्तर दिले आहे.

नितेश राणे याचा जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केले आहे. त्यात फक्त एका वाक्यात झणझणीत प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. नार्वेकरांच्या या ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने मातोश्रीचा घरगडी म्हणत टीका केलीय. तर दुसऱ्याने घरगडी जरी असला तर प्रामाणिक आहेत. तुझा साहेब दर वर्षी नवीन पक्षात. आता 2024 ला तृणमूल की द्रमुक, असा सवाल केला आहे. तर एकाने सत्तेचा गैरवापर करून सरकारी पैशाने मोठे वकील देऊन नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितेश राणे लाचारांना पुरून उरतील. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नगरपंचायतमध्ये भकास आघाडीला धूळ चारली. आता मुंबई महापालिकेतहीलाचार सेनेची हार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें