Special Report | ‘सामना’तून तीष्ण बाण…संघर्ष आणखी वाढणार ?

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारावजा धमकीच देण्यात आलीय. तर सामनामधून राज्यपालांवर करण्यात आलेली टीका ही दर्जाहीन टीका आहे. राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे. राज्यपालांनी चूक दाखवून दिली ती तुम्हाला सुधारुन घ्यावी लागली. यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसतेय ती या टीकेतून दिसतेय, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

मागच्या काही महिन्यांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर रंगलं. आता त्यात नाट्याचा पुढचा अंक दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. राज्यातील महिला असुरक्षित असल्याचा मुद्दा पुढे करुन कायदा आणि सुवस्थेच्या प्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांनालिहिलं. मुख्यमंत्र्यांनीही पुढच्या काही तासांत राज्यपालांच्या पत्राला पत्रानेच खरमरीत उत्तर दिलं. त्यानंतर आता सेना-भाजपमध्ये राजकीय शिमगा सुरु झालाय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारावजा धमकीच देण्यात आलीय.

तर सामनामधून राज्यपालांवर करण्यात आलेली टीका ही दर्जाहीन टीका आहे. राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे. राज्यपालांनी चूक दाखवून दिली ती तुम्हाला सुधारुन घ्यावी लागली. यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसतेय ती या टीकेतून दिसतेय. अशा प्रकारे किती जहरी आणि घाणेरडी टीका केली तरी टीकाकारांची प्रवृत्ती दिसते. राज्यपालांवर आणि त्या संस्थेवर कोणताही परिणाम होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सामना आणि राज्यपालांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI