Special Report | शिवसेना-भाजपचा संघर्ष यापुढे रस्त्यावर?

मुंबईत भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आलीय. मुंबईत भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मनोज कोटक, आमदार कालिदास कोळंबरकर माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे 25 वर्षाची मैत्री असलेले शिवसेना-भाजप आता पक्के वैरी झाल्याचं चित्र निर्माण होत आहे.