Special Report | चीनच्या सायबर सेनेचा भारतीयांना गंडा, दिल्ली, उत्तराखंड पोलिसांकडून 15 जणांना अटक

बिटकॉईन, चिट फंड, मल्टिलेव्हल मार्केटिंगसारख्या माध्यमातून लाखो लोकांची फसवणूक होते. पण यातून कुणीही धडा घेत नाही. यावेळी तर थेट चीनमधून फसवणूक झाली आहे.

भारतातील भोळी भाबडी जनता पुन्हा फसली गेलीय. बिटकॉईन, चिट फंड, मल्टिलेव्हल मार्केटिंगसारख्या माध्यमातून लाखो लोकांची फसवणूक होते. पण यातून कुणीही धडा घेत नाही. यावेळी तर थेट चीनमधून फसवणूक झाली आहे. चीनमधील काही मोबाईल अॅपद्वारे 5 लाख भारतीयांना निशाणा बनवण्यात आलं आहे. अवघ्या 15 दिवसांत भारतीयांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. एका सायबर हल्ल्याद्वारे चीनच्या लष्करानेच ही लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.