उंदराने बेशुद्ध रुग्णाचे डोळे कुरतडले, मुंबईच्या राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना

मुंबईतील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. राजावाडी रुग्णालयात उंदराने एका बेशुद्ध रुग्णाचे टक्क डोळे कुरतडले आहेत.

मुंबईतील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. राजावाडी रुग्णालयात उंदराने एका बेशुद्ध रुग्णाचे टक्क डोळे कुरतडले आहेत. हे सर्व होत असताना रुग्णालय कर्मचारी काय करत होते असाही प्रश्न विचारला जातोय. रुग्णाच्या नातेवाईकांनी नर्सला याबाबत विचारले असता उद्धटपणे उत्तर दिल्याची तक्रार केलीय. यानंतर आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.| Special report on Rat attack on patient in rajawadi hospital Mumbai